One Evening In Warud.
(वरुड मधील संध्याकाळ )
साधारण १०-१२ वर्ष्यापुर्वीची घटना असेन मी माझ्या आमच्या गावाला गेलेलो. मी नेहमीच तिथे उन्हाळ्याच्या सुटीत जात असे आणि 'दिवे' लावून येत असे आता या 'दिवे' लावायचा तुम्हास काय अर्थ काढायचाय तो सुद्न्य माणसाने काढावा, तर तिथे अनेक चित्र विचित्र गोष्टी व व्यक्ती आहेत ज्याचा उल्लेख इथे करावयास बसलो तर महत्वाची घटना सांगायची राहून जाईल, तर मामाच्या गावाला गेलेलो असताना माझी दिनचर्या ही ठरलेली असायची,मामाचे घर म्हणजे राजवाडाच जणू काही आता गावचे पाटील म्हटल्यावर अजून घर कसे असणार ??? वडाच मोठा तो !!!.. तर मी त्या वाड्यात गेल्यावर त्या वाड्यात रमून जात असे. दिवसभर मस्त्या करणे आणि टी.व्ही. बघणे.
एके दिवशी संध्याकाळी मी असाच टी. व्ही. बघत असताना माझ्या मामाच्या मुलाचे म्हणजेच पीयुष चे बाहेर फिरायला जायचे मन झाले, मला सुद्धा बोर होतच होते मी त्याला बोललो की चल आपण बाजारातून फिरून येऊ. आम्ही दोघ फिरत फिरत जात होतो, पियुष मला गोष्टी सांगत होता " अबे तम्या, चालशील कधीतरी चिखलदऱ्या ला , मस्त आहे न बे सगळं !! माझे मामा फोरेस्ट मधेच आहे..... आपण मस्त फिरून येऊ सेमाडोह, कोलखास...... चालत काय सांग ???" मी "जाऊ न रे पण माझ्या जवळ पैशे नाही यार आणि बाबा देणार नाही पैशे " "अरे यार !! मग कस जमेन ?? बर बघू आपण नंतर...... आं ??? काय ?? ऒ " "होना बे" मी कंटाळून बोललो. "पिया आपण शेतात जाऊ न बे यार ??? मस्त पाट्री करू न सगळे काय !! मस्त बेसन भाकरी आणि खरपूस खिचडी अर्धी जळालेली, म्हणतो का आजोबांना ?? सांग ?" पियुष ने सुसकारा टाकत आपण या बाबती प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले "हम्म !!!", आम्ही आता बोलत बोलत खूप दूर पोहचलो असू ..... पंढरी चा चौक आला माझ्या मामाचा कारखाना जवळच होता, आम्ही काही वेळ कारखान्यावर गेलो मामाने बाजूच्या "सागर रेस्टोरेंट अन्ड बार" मधून आम्हाला दोघांना कोल्ड्रींक घेऊन दिले...... थम्स अप दिले आणून, अर्थातच थम्स अपच देणार न !! कारण जरी तो "बार" असला म्हणून काय आमि दिसल्यावर मामा धावत जातील आणि आमच्या साठी दोन चिल्ड बीअर घेऊन येतील हे काही विनयबुद्धी ला सुद्धा पटत नाही. आम्ही कोल्ड्रिंक पिले आणि काही कारण नसताना वरुड सारख्या अति सुरक्षित शहरात "चला दोघांनी आता घरी जा आणि सांभाळून जा " असा मामाचा फुकटचा सल्ला घेऊन आम्ही दोघे घरी निघालो.
वरुड शहर तसे सुंदर, शांत आणि निसर्गमय. वरुड ची सुंदर संध्याकाळ तर मी कधीच विसरु शकत नाही. आम्ही दोघे घरच्या वाटेने जात होतो, आकाशात सूर्य मावळत असल्याने आकाश भगवे झाले होते, आम्ही समोर समोर जात होतो, पियुष ने टाईम पास म्हणून एक लांब काडी घेतली होती आणि तो त्या काडी ने एक रेघ बनवत तो रस्त्याने जात होता. पियुषला या उचापती खूप सुचायच्या रस्त्याने जाताना तो उनाडक्या करीत, मी सुद्धा करायचो पण पियुष त्याचा अगदी मनापासून आनंद घ्यायचा,कुठे बाटली दिसली कि उडव काडीने, तर चप्पल दिसली की "हे बघ तम्या तुझी हरवलेली चप्पल " असे म्हणत चिडवणे त्याचा आवडता छंद. मी रस्त्यावर बघून बघून समोर जात होतो तोच मला एक काळी पोलीथीन रस्त्यावर पडलेली दिसली, मी पियुष ला म्हणणार की "पियूष सांभाळ" तो पर्यंत पियुष साहेबांनी पोलीथिन ला लात सुद्धा मारली होती. जशी पियुष नी पोलीथीन ला लाट मारली तसे त्या पोलीथिन मधून काही वस्तू बाहेर उडाल्या त्यात काळी बाहुली, बांगड्या, केसं.आणि हळद कुंकू होते. "अरे बापरे !!!! अबे तम्या आता बे" पियुष घाबरल्या आवाजात म्हणाला....... माझे तर पाचावर धारण बसली. आता पर्यंत या अश्या जादू टोण्या बद्दल आईकल होत, आज पियुष भाऊंच्या कृपेने बघितले सुद्धा. "घे न साल्या...... खूप मस्त्या सुचत होत्या न ??" "नाही न बे तम्या घाबरवू नको न बे !!!" पियुष चा आवाज रडका झाला होता. माझा या गोष्टींवर सहसा विश्वास तर बसत नाही पण तेव्हा आम्ही दोघेही लहान होतो, त्यामुळे खूप घाबरलो सुद्धा होतो इतक आठवते. आम्ही ही घटना कोणासही सांगितली नाही आणि चुपचाप घरी येउन आई भवानी समोर हाथ जोडले आणि अंगारा लावला. आई तुळजाभवानी चा लहान पण पासूनच खूप आधार आहे, आई मुलांचे रक्षण करायला धावून येते, पण याचा अर्थ मुलांनी चुका करत राहिल्या पाहिजे असा होत नाही.
आज त्या घटनेला खूप वर्ष उलटले पियुष मर्चंट नेव्ही मध्ये ऑफिसर लागला जग बघून आला. मी मुंबई मध्ये वकिली करतो पण आज सुद्धा ती वरुड ची संध्याकाळ आठवणीत आहे.
** तन्मय देव **