मुंबई लोकल मधील भजन मंडळी
मित्रांनो माझे ऑफिस आहे अंधेरी ला आणि मला कुर्ला पासून शटल आहे, रोज कुर्ला ला येणे जाणे आहे. कुर्ला स्टेशन म्हणजे खतरनाक रे बाबा, तिथून कित्तेक वस्तू चोरी जातात मोबाईल काय नी लेपटोप काय, खूप तरबेज चोर आहेत रे भाऊ. कुर्ला स्टेशन आले की सदैव अलर्ट राहावे लागते दोन दोन दा मी खिसे चेक करत असतो, म्हणजे स्वतःचे खिसे बरका नाहीतर तुम्ही मलाच चोर समजाल, माझा मोबाईल कुर्ल्याला चोरी गेलेला तेव्हापासून अगदी सावधगीरी बाळगतो मी. ऑफिस संपले की आमची शटल कुर्ला स्टेशन ला पोहचते आणि मी मग वाशी किव्हा पनवेल बेलापूर अशी कोणतीही लोकल पकडतो जेणे करून मी वाशी पासून घणसोली जाऊ शकेन, तर हा प्रवास इतका त्रासदायक असतो की ज्याने त्या हार्बर लाईन ने प्रवास केलाय तोच समजू शकेन पण या प्रवासात एक सुंदर गोष्ट म्हणजे लोकाल ट्रेन मधील भजन मंडळी, उन्हात अचानक मधातच ताकासारखी वाटणारी,किव्हा तुम्ही वाळवंटात अडकले असाल आणि तहानेने व्याकूळ असाल आणि एकदम स्वच्छ गोड पाण्याचे तळे मिळावे अशे हे भजनी मंडळ या असह्य प्रवासात वाटतात आणि हा असह्य प्रवास सुसह्य करतात.
भजन हा प्रकार पुरातन काळापासून भारतात आहे, जगत्गुरू तुकाराम महाराज श्रेष्ठ कीर्तनकार होते, अनेक महापुरुषांनी भजन आणि कीर्तन यामधून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली आहे तसेच जनजागृती सुद्धा केली आहे. भजन म्हणजे हिंदू धर्माचा अविभाज्य भागच आहे. भजनाच्या रूपाने थोडे का होएना हिंदू धर्माचे दर्शन घडून येते. लोकल मध्ये हे मंडळ मोठ्या आनंदाने एक एक भजन गात असते, सूर असलाच पाहिजे हा काही नियम नाही पण भावना आणि श्रद्धा ही असतेच. जेव्हा भजन लोकाल मध्ये सुरु असते तेव्हा बाकी प्रवासी सुद्धा पुटपुटत असतात आणि मग हळू हळू हे पुटपुटने मोठा आवाज बनते आणि सगळा डब्बा भक्तिमय बनून जातो.
मला हे भजन खूप आवडतात असा वाटत कि लहानपण पुन्हा परतले. लहानपणी मी सुद्धा माझे गावी भजन आईकण्यासाठी जात असे पण बुवा चे भजनापेक्षा घड्याळाकडेच जास्त लक्ष्य. मुंबई म्हणजे सोन्याची नगरी मुंबा आई इथले दैवत म्हणूनच तिचे नाव मुंबई. या धावत्या मुंबई मध्ये इतके सुंदर भजन आईक्ण्यास मिळतात खूप छान वाटते. लोकल मध्ये काही लोक खूप लांब चा प्रवास करत असतात त्यांचा देवाचे नाव घेऊन आणि आईकून हा प्रवास सुसह्य होतो.
भजन गाणारे लोक कुठल्या धर्माचे, जातीचे आहेत हा विचार इथे कोणीच करत नाही आणि कारणार सुद्धा नाही. भगवंताच्या श्रद्धेत लीन झालेला प्रत्येक जन हा एकाच जातीचा आणि धर्माचा असतो ते म्हणजे भक्त.मुंबई ने खूप काही शिकवले, खूप काही दिले, जगाचे रंग दाखवले. मुंबई ला सोडून जाणे मला तरी शक्य नाही, आई मुंबई मध्ये मला आवडणाऱ्या खूप काही गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे हे मुंबई लोकल मधील भजन मंडळ.
जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!
**** तन्मय देव ****
No comments:
Post a Comment