Saturday, 16 February 2013

One Beautiful day - Kondeshwar Amravati.

                               ही गोष्ट कधीची ते नेमके आठवत नाही हा पण माझा लहान भाऊ चिन्मय ह्याची मौंज होती तेव्हा, कदाचित ही २००१ साल ची गोष्ट कारण चिन्मय च्या मौंजेत मी ११ वी ला होतो आणि माझी त्रासदायक आणि वाईट ११ वी आणि १२ वी मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही, काय ती शाळा आणि काय ते शिक्षण नको रे बाबा न बोललेलेच बरे. मुंज म्हटले म्हणजे ब्राह्मण लोकांचा मोठा कार्यक्रम एक लहान लग्नच म्हणा ना, चालेल. मी भयंकर आळशी आणि या लग्न आणि मौंजेच्या कार्यात तर मी कधीच स्वतः ला झोकून टाकत नाही, अक्षरशा नाकी नौ येतो मी अश्या वेळेला. मला तसे बघता घरचा सर्वात मोठा भाऊ म्हणून ही जवाबदारी घायला हवी होती पण तरी मी ती झिडकारली, उलट मी जितकी काय कामे केले असेल ती फक्त मला काका ची 'लुना' चालवायला भेटेल ह्या उद्देशातून, चिन्मय मला माफ कर. 
                                     तर असाच एक दिवस, मुंज संपून काहि एक दिवस झाला असेन मला लुना चालवायला हवी होती, मी काकाना मागितली चाबी आणि निघालो लुना घेऊन. माझा विचार होता एक लांब चक्कर मारून यायचा, तसा मी निघालो सुद्धा हेच ठरवून की थोडा लांबच जाऊया, माझ्या हेमंत काका कडून मी पेट्रोल साठी २० रु घेतलेले, अश्चर्य नका वाटून घेऊ तेव्हा होत पेट्रोल इतक स्वस्त. मी बडनेरा जवळ असलेल्या कोंडेश्वर या तीर्थक्षेत्रात जायचे ठरवीले, कोंडेश्वर हे बडनेरा वरून ७-८ की मी अंतरावर, मग काय निघालो कोंडेश्वर च्या दिशेने.... जाताना रस्ते खूपच निसर्गमय आहेत सगळी कडे अगदी हिरवळ आणि हिरवळ, मी सामोर जाता जाता पहाडांकडे बघत होतो, खूप विशाल आणि हिरवे झालेले. मला कोंडेश्वर च्या मंदिराचा कळस दिसून पडला आणि मी माझी लुना ची स्पीड वाढविली. त्या वेळी काही मंदिराला असे मोठे भव्य द्वार नव्हते, पण आता आहे. मी लुना बाजू ला पार्क करून बेल फुल विकत घेतली आणि मंदिरात शिरलो.
                                           कोंडेश्वर चे शिवमंदीर खूप पुरातन असून या मंदिराचे बांधकाम राक्षसांनी केले आहे असे म्हणतात. मंदीर अनेक आश्चर्याने परिपूर्ण आहे. मंदिराच्या शिल्पावर काही हत्ती आहेत त्यांची संख्या मोजल्यास दर वेळी वेग वेगळी भरते. असे म्हणतात की त्या मंदिराचा 'नंदी' हा रोज तीळ  तीळ सरकतो, बाकी ह्याला काही ठोस पुरावा नाही. मी आत गेलो मधात सुंदर असे शिवलिंग होते मी त्यावर बेल फूल वाहिले आणि आत असलेल्या छोट्या छोट्या बारा जोतीर्लीन्गाचे दर्शन सुद्धा घेतले. मनात वाटत होते की घरी काही काम तर नसेल ?? पण तुम्हाला सांगतो मित्रांनो मला लग्न, गृहशांती,मुंज  असल्या लांबलचक  कार्यक्रमांचा भयंकर तिटकारा आहे, म्हणूनच मी फक्त 'रिसेप्शन' ला जातो एका घंट्यात मोकळं . तर मी शिवशंकराचे दर्शन घेऊन पुढल्या वाटेला निघालो. येतांना मोकळे असलेले आकाश आता काळे पडून गडगडू लागले होते, विजा अधून मधून माझे फोटो काढत होत्या, जोरदार सरी कोसळणार होत्या.
                                    अजून अर्धे सुद्धा आलो नसेल तर मला पावसाने झोडपून काढले, मला थंडी वाजत होती आणि भूक सुद्धा जोरदार लागली होती. लुना चिखलात फसून जाऊ नये म्हणून मी तिला एक झाडाखाली पार्क करून तिथे उभा झालो. थंडी वाढत होती, पाउस थांबत होता आणि पुन्हा जोराने थंड हवा वाहत होती, तर पुन्हा पाऊन कोसळत होता. दूर मला एक मंडप टाकलेला दिसला, पावसाने तो चिंब होता आणि हवेने हलत होता. मी हिय्या करून पावसात निघालो आणि धावतच मंडपात घुसलो, मंडप जरी ओला चिंब होता तरी आत पुष्कळशी कोरडी जागा होती. आत गावातील काही मंडळी बसली होती आणि पंगती वाढल्या जात होत्या, त्यांना पाउस जोरदार होवून मंडप गळू लागायच्या पहिले कदाचित जेवणे उरकायची असणार. 

"कोण ?? सद्या  कारे ?? आर जेव ना राजा का ओला  झाल्यावर जेवतो ?" एक व्यक्ती मला म्हणाला.

"मी सद्या नाही भाऊ, मी असाच आल्तो दर्शनाले, ...... माय नाव तन्मय" मी बोललो.

"आसं ??? कोण गावचे ??? " तो व्यक्ती बोलला 

"बडनेरा " मी 

"बर बर ...... काय नाव म्हनल?? तनमन ????" एक आजी विचरत होती.

मी "नाही आजी, तनमन नाही तन्मय..... तन्मय देव " 

"होका ??? देव डाक्टर ?? ते कोण तुमचे ??" त्या पहिल्या व्यक्तीने विचारल.

"माझे आजोबा आहे  ते........... वारले ते दोन वर्ष्या आधी  " मी 

असे म्हटल्यावर त्या आजीने एकदम माझा हात धरला आणि म्हणाली "आर देव डाक्टर म्हणजे देव होते रे खरे खुरे, ये बाप्पा तू नातू हास त्यांचा जेव मा थोड, लाय बरसात हाय जा थोड्या दमान घरी "

                                    माझे आजोबा खरच देव होते त्यांच्यावर त्यांच्या पेशंट चे खूप प्रेम होते, मी तसा सुद्धा उपाशी होतो आणि भूक सुद्धा जाम लागलेली आणि त्यात समोर मस्त रस्सा भाजी वांग्याची आणि खमंग रोडगे, रोडगे म्हणजे कणकीचे मोठे गोळे तेल लावून गोल करायचे आणि आगीत भाजायचे आणि तूप घेऊन रस्सा भाजी सोबत खायचे, आमच्या विदर्भातील लोकांचा हा आवडता पदार्थ. मी मस्त रोडग्या वर ताव मारला आणि त्यांना धन्यवाद देवून तिथून पाउस कमी  झाल्यावर निघालो. संपूर्ण रस्ता पाण्याने नाहून निघालेला होता. लुना रस्त्यावरून जात असतांना रस्ता पाण्याने चमकत होता. मी थोडा समोर गेलो असेन तर मला एक हरणांचा कळप धावत आत झाडाझुडपात जातांना दिसला. माझ्या घराच्या मी जवळच आलो होतो तर एका टपरी वरून येणाऱ्या गरम चहाच्या सुगंधाने माझे लक्ष्य तिकडे वळविले. मी चहाच्या एक एक सिप सोबत ओल्या मातीचा सुगंध घेत होतो. त्या मृदगंधाने माझे मन प्रफ्फुल्लीत झाले होते, आणि बाजूलाच लोकांचे बोलणे घोळक्याने सुरु होते.

"काय पाउस आला लेका,.......... नाही काय रे ???"

मी हसत हसत लुना सुरु केली आणि माझ्या घरच्या दिशेने निघून गेलो.
                                     

Melghat Tiger Reserve - Cobara Snake - Tanmay Deo


Melghat Tiger Reserve - Tree House - Tanmay Deo


Monday, 4 February 2013

Tiger Calling - Tanmay Deo



       Tiger Calling - Nagzhira Tiger Reserve 


              "हळू हळू जाऊ दे रे बाबा इथून गाडी" मी नागझिरा च्या जंगलातील एका अरुंद रान वाटेकडे बघून माझ्या भावाला बोललो. 

 " अरे टेन्शन मत ले रे टी. डी. ( अर्थात तन्मय दादा ) फट्टू हे क्या बे तू ???? " डॉ. आदित्य देव माझे लहान बंधू , मला माझ्या बोलण्याला उत्तर देताना म्हणाले.


 " ठीक हे पर थोडा संभाल के जंगल के अपने कूछ  नियम होते हे, क्या समझा ???" मी


"भाई, जब जंगल मी सुलतान मिर्झा होता हे न तब अपने नियम चलते हे " आदी स्टाईल मारत बोलला आणि त्याने हळुवार गाडी त्या अरुंद वाटेवरून खाली काढली.


             आदित्य माझा लहान भाऊ, व्यवसायाने डॉक्टर आणि छंदाने बॉडी बिल्डर........... मला हे पडलेले एक गूढ कोडे आहे, हे अंगा पिंडाने पहेलवान लोक संकटात स्वतः पडण्यास का धडपडत असतात ??? जर कोणी त्यांना काळजी घायला लावली तर तो व्यक्ती त्या पहेलवानासाठी 'फट्टू' होवून जातो, जसा मी झालो आत्ता.. पण रानवाटेने  जाताना कार ही सांभाळून काढायलाच हवी, एक तर वाट अरुंद असल्याने गाडी ला हार्म होण्याची शक्यता आणि दुसरी बाब म्हणजे जर का तेथे कुठला बिळात राहणारा  किव्हा जमिनीवर सरपटणारा  वन्य प्राणी असेल तर त्याचा बळी जायचा जसे, साप, विंचू किव्हा इतर वन्य सरपटणारे प्राणी.


"भाई तेरेकु एक बात बताऊ ? में हफ्ते मे एक चक्कर तो मारता ही हु याहा पे " आदित्य च्या आवाजाने माझे दाट झाडा झुडपात केंद्रित झालेले लक्ष्य विचलित झाले. मला तिथे अचानक काही तरी हालचाल जाणवली होती.






"छोटे गाडी रोकना तो जरा कुछ हलचल हुवी वहा पे " मी


"कहा ??? वो बील के पास न ? बडे वाले ?? मुझे भी लागा..... रुक रिव्हर्स लेता हु " आदी ने गाडी मागे घेतली.


"कॅमेरा लाना भाई " मी गाडी च्या खाली उतरत आदी ला म्हटले.


"क्यू??" आदी


"अरे अगर कोई पगमार्क मील जाता  हे तो फोटो ले लेंगे रे बाबा " मी "शीट अप्पन ने प्लास्टर ऑफ पेरिस भी साथ नाही लाया, ट्रेस लेने के लिये " मी हडबडून बोललो.


"अरे भाई देख तो इधर...... जल्दी आ जा" आदी ओरडला


"अरे सही रे आदी ये तो बिबट हे यार " मी त्या वारुळाच्या जवळ असलेल्या पगमार्क कडे बघून बोललो.


"मुझे लागा टायगर हे " आदी


"नही टायगर का पगमार्क बडा होता हे, ये बिबट  हे " मी


मी आजू बाजूच्या परिसराचा आढावा घेत होतो, एक शांतता सर्व जंगलावर पसरली होती. जागा सुद्धा छान होती, टायगर असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गर्द झाडे झुडपे सगळी कडे होते, असे वाटत होते की कोणत्या निसर्ग चित्रकाराने गडद हिरवा रंग वापरून त्या परिसराचे चित्र रंगविले आहे. तेवढ्यात...........


"ख्याक !!!! ख्याअक्क " माकडाच्या जोरदार खाकरण्याचा आवाज आला, मी आदी कडे चमकून बघितले.... आदी स्तब्ध उभा होता. पक्ष्यांनी जोर जोरात आवाज करणे सुरु केले, मला आणि आदी ला लगेच समजले की हे सगळे सावधगिरीचे इशारे आहेत. याला टायगर आजू बाजू ने असल्याची कॉलिंग म्हणतात. विविध प्राणी आणि पक्षी जंगलाचा राजा जवळच असल्याचे धोक्याचे इशारे एकमिकांना करतात.


"टी. डी. भाई अब ???? कार मी बैठते क्या ??" आदी ने सावधगिरीने विचारले.


"नाही रुक ५ मीनिट " मी तीव्र होणाऱ्या आवाजाकडे लक्ष्य देवून होतो, "ख्याअक कयाक ख्याअक " माकडांनी आवाज सुरु केला.


"गुर्र्र्र्र्र्र्र्र्र........हर्र्र्र्र्र्र्र्र " अशे हलके आवाज येऊ लागले. हा वाघाचाच गुरगुरण्याचा आवाज होता. वाघ होता हे मात्र नक्की बिबट सुद्धा असू शकेन कारण पगमार्क बिबट चा होता, मी वाथ बघत होतो ती त्याचे सायटिंग व्हायची. 


मला पक्की खात्री झाली होती की टायगर नाहीतर बिबट आसपासच आहे.


"भाई गुर गुर सुनाई दे रही हे " आदी च्या चेहऱ्यावर विलक्षण कुतुहलता होती, त्याला वाघाला बघायचेच होते.


असे म्हणतात की ज्या निसर्ग प्रेमीने वाघाला जंगलात बघितले, त्याची तेव्हा रीतसर वन्यप्राणी जगात नोंदणी झाली असे समजावे. मी पहिल्याच ट्रेक मध्ये 'बिबट'  बघीतला होता त्यामुळे माझी पहिल्याच दिवशी नोंदणी झाली होती, पण वाघ बघायचा माझा राहिला होता वाटले आता ती सुद्धा इच्छा पूर्ण होणार आणि आदि ची तर आज नोंदणी होणारच होती. आवाज तीव्र झाला आणि हळू हळू कमी होत होत नाहीसा झाला, वाघ निघून गेला होता. आदी आणि मी दोघेही खूप निराश झालो. पण ही निराशा दुसऱ्या दिवशी वाघाने आम्हाला दर्शन दिल्याने दूर झाली, त्या चित्त थरारक प्रसंगाचे वर्णन आपल्याला माझ्या पुस्तकात "पगमार्क" मध्ये वाचायला  भेटेल.


पण तो टायगर कॉलिंग चा अनुभव मी कधीच विसरणार नाही.


- तन्मय देव.  


Friday, 1 February 2013

Melghat Tiger Reserve's beautiful pictures - Tanmay Deo

The Banglow where we stayed in Melghat  



We on the night of tracking in Kolkhas 


Ready to roam in Jungle 


Just love horse riding lolzzz

                 
                       Pankaj and Vijendra at some rest hours  

        
                          
                         Monkey seated on a tree in valley 








ME on a finale day of tracking in MELGHAT TIGER RESERVE.

Thursday, 31 January 2013

One Evening In Warud (वरुड मधील संध्याकाळ )

                 One Evening In Warud.
                   (वरुड मधील संध्याकाळ )

                                             

             साधारण १०-१२ वर्ष्यापुर्वीची घटना असेन मी माझ्या आमच्या गावाला गेलेलो. मी नेहमीच तिथे उन्हाळ्याच्या सुटीत जात असे आणि 'दिवे' लावून येत असे आता या 'दिवे' लावायचा तुम्हास काय अर्थ काढायचाय तो सुद्न्य माणसाने काढावा, तर तिथे अनेक चित्र विचित्र गोष्टी व व्यक्ती आहेत ज्याचा उल्लेख इथे करावयास बसलो तर महत्वाची घटना सांगायची राहून जाईल, तर मामाच्या गावाला गेलेलो असताना माझी दिनचर्या ही ठरलेली असायची,मामाचे घर म्हणजे राजवाडाच जणू काही आता गावचे पाटील म्हटल्यावर अजून घर कसे असणार ???  वडाच मोठा तो !!!.. तर मी त्या वाड्यात गेल्यावर त्या वाड्यात रमून जात असे. दिवसभर मस्त्या  करणे आणि टी.व्ही. बघणे. 
            एके दिवशी संध्याकाळी मी असाच टी. व्ही. बघत असताना माझ्या मामाच्या मुलाचे म्हणजेच पीयुष  चे बाहेर फिरायला जायचे मन झाले, मला सुद्धा बोर होतच होते मी त्याला बोललो की चल आपण बाजारातून फिरून येऊ. आम्ही दोघ फिरत फिरत जात होतो, पियुष मला गोष्टी सांगत होता " अबे तम्या, चालशील कधीतरी चिखलदऱ्या ला , मस्त आहे न बे सगळं !! माझे मामा फोरेस्ट मधेच आहे..... आपण मस्त फिरून येऊ सेमाडोह, कोलखास...... चालत काय सांग ???" मी "जाऊ न रे पण माझ्या जवळ पैशे नाही यार आणि बाबा देणार नाही पैशे " "अरे  यार !! मग कस जमेन ?? बर बघू आपण नंतर...... आं ??? काय ?? ऒ  " "होना बे" मी कंटाळून बोललो. "पिया आपण शेतात जाऊ न बे यार ??? मस्त पाट्री करू न सगळे काय !! मस्त बेसन भाकरी आणि खरपूस खिचडी अर्धी जळालेली, म्हणतो का आजोबांना ?? सांग ?" पियुष ने सुसकारा टाकत आपण या बाबती  प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले  "हम्म !!!", आम्ही आता बोलत बोलत खूप दूर पोहचलो असू ..... पंढरी चा चौक आला माझ्या मामाचा कारखाना जवळच होता, आम्ही काही वेळ कारखान्यावर गेलो मामाने बाजूच्या "सागर रेस्टोरेंट अन्ड बार" मधून आम्हाला दोघांना कोल्ड्रींक घेऊन दिले...... थम्स अप दिले आणून, अर्थातच थम्स अपच देणार न !! कारण जरी तो "बार" असला म्हणून काय आमि दिसल्यावर मामा धावत जातील आणि आमच्या साठी दोन चिल्ड बीअर घेऊन येतील हे काही विनयबुद्धी ला सुद्धा पटत नाही. आम्ही कोल्ड्रिंक पिले आणि काही कारण नसताना वरुड सारख्या अति सुरक्षित शहरात "चला दोघांनी आता घरी जा आणि सांभाळून जा " असा मामाचा फुकटचा सल्ला घेऊन आम्ही दोघे घरी निघालो.
            वरुड शहर तसे सुंदर, शांत आणि निसर्गमय. वरुड ची सुंदर संध्याकाळ तर मी कधीच विसरु शकत नाही. आम्ही दोघे घरच्या वाटेने जात होतो, आकाशात सूर्य मावळत असल्याने आकाश भगवे झाले होते, आम्ही समोर समोर जात होतो, पियुष ने टाईम पास म्हणून एक लांब काडी घेतली होती आणि तो त्या काडी ने एक रेघ बनवत तो रस्त्याने जात होता. पियुषला या उचापती खूप सुचायच्या रस्त्याने जाताना तो उनाडक्या करीत, मी सुद्धा करायचो पण पियुष त्याचा अगदी मनापासून आनंद घ्यायचा,कुठे बाटली दिसली कि उडव काडीने, तर चप्पल  दिसली की "हे बघ तम्या  तुझी हरवलेली  चप्पल " असे म्हणत चिडवणे त्याचा आवडता छंद. मी रस्त्यावर बघून बघून समोर जात होतो तोच मला एक काळी पोलीथीन रस्त्यावर पडलेली दिसली, मी पियुष  ला म्हणणार की "पियूष सांभाळ" तो पर्यंत पियुष साहेबांनी पोलीथिन ला लात  सुद्धा मारली होती. जशी पियुष नी पोलीथीन ला लाट मारली तसे त्या पोलीथिन मधून काही वस्तू बाहेर उडाल्या त्यात काळी बाहुली, बांगड्या, केसं.आणि हळद कुंकू होते. "अरे बापरे !!!! अबे तम्या आता बे" पियुष घाबरल्या आवाजात म्हणाला....... माझे तर पाचावर धारण बसली. आता पर्यंत या अश्या जादू टोण्या बद्दल आईकल होत, आज पियुष भाऊंच्या कृपेने बघितले सुद्धा. "घे न साल्या...... खूप मस्त्या सुचत होत्या न ??"  "नाही न बे तम्या घाबरवू नको न बे !!!" पियुष चा आवाज रडका झाला होता. माझा या गोष्टींवर सहसा विश्वास तर बसत नाही पण तेव्हा आम्ही दोघेही लहान होतो, त्यामुळे खूप घाबरलो सुद्धा होतो इतक आठवते. आम्ही ही घटना कोणासही सांगितली नाही आणि चुपचाप घरी येउन आई भवानी समोर हाथ जोडले आणि अंगारा लावला. आई तुळजाभवानी चा लहान पण पासूनच खूप आधार आहे, आई मुलांचे रक्षण करायला धावून येते, पण याचा अर्थ मुलांनी चुका करत राहिल्या पाहिजे असा होत नाही. 
            आज त्या घटनेला खूप वर्ष उलटले पियुष मर्चंट नेव्ही मध्ये ऑफिसर लागला जग बघून आला. मी मुंबई मध्ये वकिली करतो पण आज सुद्धा ती वरुड ची संध्याकाळ आठवणीत आहे.

                            ** तन्मय देव **




Friday, 18 January 2013

Bhajan Mandal Of Mumbai Local (मुंबई लोकल मधील भजन मंडळी )


                   मुंबई लोकल मधील भजन मंडळी 

                           मित्रांनो माझे ऑफिस आहे अंधेरी ला आणि मला कुर्ला पासून शटल आहे, रोज कुर्ला ला येणे जाणे आहे. कुर्ला स्टेशन म्हणजे खतरनाक रे बाबा, तिथून कित्तेक वस्तू चोरी जातात मोबाईल काय नी लेपटोप काय, खूप तरबेज चोर आहेत रे भाऊ. कुर्ला स्टेशन आले की सदैव अलर्ट राहावे लागते दोन दोन दा मी खिसे चेक करत असतो, म्हणजे स्वतःचे खिसे बरका नाहीतर तुम्ही मलाच चोर समजाल, माझा मोबाईल कुर्ल्याला चोरी गेलेला तेव्हापासून अगदी सावधगीरी बाळगतो मी. ऑफिस  संपले की आमची शटल कुर्ला स्टेशन ला पोहचते आणि मी मग वाशी किव्हा पनवेल बेलापूर अशी कोणतीही लोकल पकडतो जेणे करून मी वाशी पासून घणसोली जाऊ शकेन, तर हा प्रवास इतका त्रासदायक असतो की ज्याने त्या हार्बर लाईन ने प्रवास केलाय तोच समजू शकेन पण या प्रवासात एक सुंदर गोष्ट म्हणजे लोकाल ट्रेन मधील भजन मंडळी, उन्हात अचानक मधातच ताकासारखी वाटणारी,किव्हा तुम्ही वाळवंटात अडकले असाल आणि तहानेने व्याकूळ असाल आणि एकदम स्वच्छ गोड पाण्याचे तळे मिळावे अशे हे भजनी मंडळ या असह्य प्रवासात वाटतात आणि हा असह्य प्रवास सुसह्य करतात.
                          भजन हा प्रकार पुरातन काळापासून भारतात आहे, जगत्गुरू तुकाराम महाराज श्रेष्ठ कीर्तनकार होते, अनेक महापुरुषांनी भजन आणि कीर्तन यामधून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली आहे तसेच जनजागृती सुद्धा केली आहे. भजन म्हणजे हिंदू धर्माचा अविभाज्य भागच आहे. भजनाच्या रूपाने थोडे का होएना हिंदू धर्माचे दर्शन घडून येते. लोकल मध्ये हे मंडळ मोठ्या आनंदाने एक एक भजन गात असते, सूर असलाच पाहिजे हा काही नियम नाही पण भावना आणि श्रद्धा ही असतेच. जेव्हा भजन लोकाल मध्ये सुरु असते तेव्हा बाकी प्रवासी सुद्धा पुटपुटत असतात आणि मग हळू हळू हे पुटपुटने मोठा आवाज बनते आणि सगळा डब्बा भक्तिमय बनून जातो.
मला हे भजन खूप आवडतात असा वाटत कि लहानपण पुन्हा परतले. लहानपणी मी सुद्धा माझे गावी भजन आईकण्यासाठी जात असे पण बुवा चे भजनापेक्षा घड्याळाकडेच जास्त लक्ष्य. मुंबई म्हणजे सोन्याची नगरी मुंबा आई इथले दैवत म्हणूनच तिचे नाव मुंबई. या धावत्या मुंबई मध्ये इतके सुंदर भजन आईक्ण्यास मिळतात खूप छान वाटते. लोकल मध्ये काही लोक खूप लांब चा प्रवास करत असतात त्यांचा देवाचे नाव घेऊन आणि आईकून हा प्रवास सुसह्य होतो.
                            भजन गाणारे लोक कुठल्या धर्माचे, जातीचे आहेत हा विचार इथे कोणीच करत नाही आणि कारणार सुद्धा नाही. भगवंताच्या श्रद्धेत लीन झालेला प्रत्येक जन हा एकाच जातीचा आणि धर्माचा असतो ते म्हणजे भक्त.मुंबई ने खूप काही शिकवले, खूप काही दिले, जगाचे रंग दाखवले. मुंबई ला सोडून जाणे मला तरी शक्य नाही, आई मुंबई मध्ये मला आवडणाऱ्या खूप काही गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे हे मुंबई लोकल मधील भजन मंडळ.

                          जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!  


                        ****      तन्मय देव    ****