दिल्ली ला जे घडले ते बघून वाटत कि आज जगात माणुसकीचा लवलेशही राहिलेलेला नाही, अरे !! असा घृणास्पद अपराध !!! इतके घाणेरडे कृत्य !! अरे माणसाच्या पोटी जन्मले की कुत्र्याच्या ??? जनावरे सुद्धा अशी वागत नाही जसे ते दिल्ली बलात्कार कांड मधील भामटे आरोपी वागले. त्या मुलीच्या आयुष्याचा बट्याबोळ करून हरामखोर आता म्हणतात कि आम्ही खूप घृणास्पद कृत्य केले आहे आम्हाला फाशी द्या, देणारच, हमखास देणार..... अर्थात आम्ही हे आमच्या मनाची भावना सांगितली कारण एक वकील असल्यामुळे मला ही गोष्ट माहित आहे की भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६ प्रमाणे त्या नराधमांना फक्त जन्मठेप होवू शकते.
आज हिंदुस्तानातून मागणी होत आहे कि बालात्कार्यांना फाशी ची शिक्षा हवी, चला अखिल भारतीय जनतेचे म्हणणे आईकून आमच्या सरकारने फाशी ची तरतूद केली जरी, आपल्या कायद्यात तरी काय त्यांना तत्काळ फाशी होणार ? अश्या खूप गोष्टी आहेत हो !! कायद्यावर आमचा नक्कीच विश्वास आहे पण "Justice delayed is justice denied " न्याय जर पीडित व्यक्ती च्या मृत्यू नंतर भेटत असेल तर अश्या न्यायला काय अर्थ आहे ??? प्रश्न हा नाही कि बलात्कार करणाऱ्या कुत्र्याच्या बच्च्याला फाशी द्यायची कि जन्मठेपच ठीक आहे, पण प्रश्न हा आहे की अशे अपराध समाजात होतात का? का बंर स्त्री भारतात सुरक्षित नाही ? काय आपल्या मनगटात इतका दम नाही कि आपण अश्या हरामी लोकांना वठणीवर आणू शकू?? आणि नक्कीच आज अशी परीस्तीत आहे की स्त्री ने आपल्या पर्स मध्ये स्वसंरक्षण करण्यासाठी चाकू किव्हा तिखटाचे पाकीट ठेवाया हवे मारा कामिन्यांच्या डोळ्यात तिखट, अशे हरामखोर दिसेल त्यांना तिथेच ठेचायला हवे, तेव्हा या खराब प्रवृती संपेल आणि भारत एक नवी पहाट बघेल.
*** तन्मय देव ***