Sunday, 9 December 2012

Melghat Tiger Reserve

                        
                            मेळघाट व्याघ्र प्रकल्प 


                                आज मी तुम्हाला ज्या जंगलाबद्दल माहिती सांगणार आहे ते जंगल म्हणजे अमरावती जवळ असलेले मेळघाट चे जंगल. अतीशय हिरवेगार आणि घनदाट असे मेळघाट चे जंगल आजू बाजूच्या परिसरात सुद्धा प्रसिद्ध आहे. मेळघाट ला व्याघ प्रकल्प घोषित करण्यात आले आणि मेळघाट चे महत्व खूप वाढले. नक्कीच वाघाच्या रक्षणाच्या दृष्टीने मेळघाट उत्तम आहे आणि त्याचा पुरावा आपल्याला प्रत्यक्ष मेळघाट ला गेल्यावर भेटतो. तसाच मेळघाट मध्ये आदिवासी बांधवांची एक वेगळी संस्कृती अस्तित्वात आहे. आदिवासी बांधव जंगलाचा रक्षणात वनविभागाची नेहमीच मदत करतात. 

                                
                             मेळघाट  जंगलात वाघ, बिबट , अस्वल, अस्वल, चितळ, कोल्हे, लांडगे, रानमांजर, बायसन, विविध पक्षी , विषारी बीनविषारी सर्प तसेच विविध वनस्पती आढळतात. मी खूप वर्षांपासून मेळघाट मध्ये पदभ्रमण करत आहे, माला अनेक वन्य प्राण्यांची सायटिंग सुद्धा  झाली आहे. ज्या लोकांना वन्य प्राणी तसेच निसर्गाचा अभ्यास करायचा असेल त्यांच्या साठी मेळघाट म्हणजे बेस्ट आहे. चिखलदरा इथे राहायची उत्तम व्यवस्था सुद्धा आहे. 



                                  चिखलदरा हा मेळघाटचाच एक भाग असून हा परिसर जसा काही निसर्गाने दत्तक घेतला आहे. वरील फोटो हा चिखलदरा च्या माकडाचा आहे तेथे माकड संखेने जास्त असून अगदी रस्त्याच्या शेजारी सुद्धा तुम्हाला दिसून पडतात. चिखलदरा ला अस्वल सुद्धा जास्त आहेत तसेच ते संध्याकाळी बाहेर सुद्धा पडतात त्यामुळे चिखलदरा ला संध्याकाळ नंतर बाहेर फिरणे म्हणजे धोकादायकच आहे. मेळघाट चे जंगल म्हणजे वेगवेगळ्या घाटांचा मेळ त्याच मुळे त्याला "मेळघाट " असे म्हणतात. मेळघाट मध्ये वाघाला पाहणे म्हणजे खूपच दुर्लभ. जंगलात तसे सुद्धा वाघ दिसणे म्हणजे नशीब बलवत्तर असे म्हणतात कारण कि वाघ ला जंगलाचा राजा आहे आणि वाघ सहसा समोर येत नाही. मेळघाट मध्ये बायसन, हरीण, तडस तसेच वेगवेगळ्या पक्ष्यांची सायटिंग होण्याचे चान्सेस जास्त आहे. टायगर बघण्यासाठी मार्च, एप्रील आणि मे  हे तीन महिने बेस्ट, कारण की उन्हाळ्यात जंगलातील पाणवठे सुकून जातात आणि वन्य प्राणी पाणी पिण्याकरिता बाहेर पडतात आणि टायगर दिसण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. 





                            टायगर बघायचा असल्यास आपल्याला ट्री हाउस  चा खूप फायदा होतो याला माचान  सुद्धा म्हणतात. या माचानी पाणवठ्याजवळ असतात जनावर पाणी प्यायला आले कि त्यांचा छान अभ्यास आपण करू शकतो. टायगर आपल्या  कब्स  सोबत पुष्कळदा उन्हाळ्यात इथे पाणी प्यायला  येतात. वरील फोटो हा नरनाळा  येथील आहे, इथे सुद्धा टायगर दिसण्याचे चान्सेस खूप आहेत, मेळघाट पासून काहीच अंतरावर नरनाळा अभयारण्य  आणि नरनाळा किल्ला आहे, त्याचा मी बनविलेला व्ही डी ओ वर पेस्ट केलेला आहे.



                                 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग म्हणजे 'सेमाडोह', इथली लोकं जणू काही निसर्गाच रक्षण करण्यास नेहमीच तत्पर आणि पर्यटकांना माहिती देण्यास समोर असतात. वरील फोटो हा मी काढला असून तो सेमाडोह ला एका गावकर्याच्या घरात निघालेल्या कोब्रा सापाचा आहे. गावातील लोकांनी त्या सापाला जीवनदान दिले, माझा गाईड मित्र 'भोला' ने त्याला पकडले आणि जंगलात सोडून दिले. हाच साप जर शहरात निघाला असता तर कदाचित त्याचा जीव घेऊन काही डरपोक लोकांनी त्याला काठीवर घेऊन आपण त्याला मारून किती मोठे युध्द जिंकले किव्हा आम्ही किती महान आहे हे दाखवून दिले असते, अश्या मूर्खांना आपण सर्वात मोठे गाढे आहोत हेय माहित नसते. सगळेच सर्प हे काही विषारी नसतात फक्त नाग, घोणस , मण्यार आणि फुरसे हे चार विषारी साप प्रामुख्याने  सापडतात बाकी सर्प हे  विषारी अथवा बीन विषारी असतात पण महामुर्खांसमोर डोकं फोडून काही उपयोग नसतो त्यांच्या मते सगळेच सर्प विषारी असून त्यांना मारायलाच पाहिजे ही त्यांचे कुबुद्धी. मित्रांनो साप दिसल्यावर सर्पमित्रांना आपण दूरध्वनी करावा जेणे करू ते तत्काळ तिथे पोहचून त्या सापाला वाचवतील.




                            मेळघाट मध्ये असे छोटे छोटे पाणवठे खूप आहेत आणि इथे टायगर सुद्धा दिसून येतात. वरील फोटो हा मेळघाटच्या एका पाणवठा चा आहे इथे माझ्या मित्राने टायगर बघितला होता तो सुद्धा कब्स सोबत. मेळघाट पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूपच सुंदर दिसते, उन्हाळ्यात सुद्धा मेळघाट खुलते पण तो मौसमच जणू फक्त सायटिंग चा असतो. सगळे जंगल रखरखत्या उन्हामुळे सुकून गेले असते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे वन्य प्राणी आपली भटकंती सुरु करतात, अश्या वेळी टायगर आणि इतर वन्य प्राण्यांची सायटिंग होवू शकते.


                                                                                     - तन्मय देव   

No comments:

Post a Comment