Saturday, 22 December 2012

Rape Of Humanity (बलात्कार)




                   Rape Of Humanity (बलात्कार)

                         दिल्ली ला जे घडले ते बघून वाटत कि आज जगात माणुसकीचा लवलेशही राहिलेलेला नाही, अरे !! असा घृणास्पद अपराध !!! इतके घाणेरडे कृत्य !! अरे माणसाच्या पोटी जन्मले की कुत्र्याच्या ??? जनावरे सुद्धा अशी वागत नाही जसे ते दिल्ली बलात्कार कांड मधील भामटे आरोपी वागले. त्या मुलीच्या आयुष्याचा बट्याबोळ करून हरामखोर आता म्हणतात कि आम्ही खूप घृणास्पद कृत्य केले आहे आम्हाला फाशी द्या, देणारच, हमखास देणार..... अर्थात आम्ही हे आमच्या मनाची भावना सांगितली कारण एक वकील असल्यामुळे मला ही गोष्ट माहित आहे की भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६ प्रमाणे त्या नराधमांना फक्त जन्मठेप होवू शकते.
                       आज हिंदुस्तानातून मागणी होत आहे कि बालात्कार्यांना फाशी ची शिक्षा हवी, चला अखिल भारतीय जनतेचे म्हणणे आईकून आमच्या सरकारने फाशी ची तरतूद केली जरी, आपल्या कायद्यात तरी काय त्यांना तत्काळ फाशी होणार ? अश्या खूप गोष्टी आहेत हो !! कायद्यावर आमचा नक्कीच विश्वास आहे पण "Justice delayed is justice denied " न्याय जर पीडित व्यक्ती च्या मृत्यू नंतर भेटत असेल तर अश्या न्यायला काय अर्थ आहे ??? प्रश्न हा नाही कि बलात्कार करणाऱ्या कुत्र्याच्या बच्च्याला फाशी द्यायची कि जन्मठेपच ठीक आहे, पण प्रश्न हा आहे की अशे अपराध समाजात होतात का? का बंर स्त्री भारतात सुरक्षित नाही ? काय आपल्या मनगटात इतका दम नाही कि आपण अश्या हरामी लोकांना वठणीवर आणू शकू?? आणि नक्कीच आज अशी परीस्तीत आहे की  स्त्री ने आपल्या पर्स मध्ये स्वसंरक्षण करण्यासाठी चाकू किव्हा तिखटाचे पाकीट ठेवाया हवे मारा कामिन्यांच्या डोळ्यात तिखट, अशे हरामखोर  दिसेल त्यांना तिथेच ठेचायला हवे, तेव्हा या  खराब प्रवृती  संपेल आणि भारत एक नवी पहाट बघेल.



  
                                        *** तन्मय देव ***

Pugmark - Tanmay Deo

   
Adv. Tanmay Deo 

                                        पगमार्क (Pugmark)  


                                      मित्रांनो मी मला जंगलात पदभ्रमण करतांना आलेल्या माझ्या अनुभवांना पुस्तकरूपात आपल्यासमोर आणणार आहे. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनच्या संदर्भात मी प्रयत्नशील असून लवकरात लवकर हे पुस्तक आपणास वाचायला भेटावे त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. पुस्तक पूर्ण झाले असून काही क्षुल्लक भाग हा पुन्हा लिहिणे भाग आहे. माझे पुस्तक हे मार्च महिन्याचे आस पास प्रकाशित करण्याचा माझा मानस  आहे. आपण वाचक वर्ग यासाठी मला सहकार्य कराल याची आला जाणीव आहे त्यामुळे मला २-३ महिन्याचा अवधी अजून द्यावा जेणे करून मी योग्य रीत्या माझे पुस्तक आपल्या सामोरे प्रस्तुत करू शकलो पाहिजे.

                                             धन्यवाद !!



                                                                                                                              आपलाच  

                                                                                                        -                 तन्मय देव                                                         

Friday, 21 December 2012

Pohara-Malkhed Forest Amravati


                        Pohara Forest Amravati

                                Pohara forest is the forest near Amravati District in Maharashtra (Vidarbha region). This forest is actually under the reign of Amravati Forest Department. This forest area also contains good number of flora and fauna. There is a cat family species existence in pohara that is Leopard. I am now residing in economical capital of Hindustan dats MUMBAI but really missing Nature capital(its my words ok) near my village  that is Pohara Forest and from my home town Amravati the nearest Tiger Reserve is Melghat Tiger Reserve.  Just like when you are hungry hard you can adjust your hunger with samosa and kachories also(If you are in Mumbai then its VADA PAAV) I was used to satisfy my hunger by tracking in Pohara Malkhed Forest area.
                                When I was in my collage for doing graduation in Arts, at that time I was in N.S.S. I want to make one thing clear here....No not clear its.... 'Crystal clear' yes that's the word Crystal clear that I am not follower of M.K.Gandhi, but I am follower of Netaji Shubhash Chandra Bose and Swatantyaveer Vinayak Damodar Sawarkar. So..... yes when i was in N.S.S. I attend one camp in Pohara forest and that was the first instance when I sighted Leopard in forest. After that I satrted my work for wildlife and Nature protection. I was very lucky to have Pohara about 10 km and Melghat about 65 km form my home town. I have tracked in Pohara numerous times and sighted Leopard, Neilgaay,Snake(Viper), wild boar, Deer, Chinkara Deer (I sighted them on the same day of leopard sighting).
                                I am always of this opinion that if you are a new comer and you have not experience of wildlife tracking then first choose to track in some limited area forest rather than any Tiger reserve directly. My brother Shubham always ask me "why don't you take me with you in Melghat when I told you that I am also interested in Wildlife Conservation and nature protection", guys if you are new then better to move small forest first, if you are new and tracking directly to Melghat or other tiger reserve then possibilities might be worst. If new comers are choosing big forest without tracking in small one then they must be accomplish by senior member or forest personnel, because if they have encounter with sloth bear then the personnel who is with him will also not take the proper judgement what to do.  
                                 The Tiger Reserves are school while the small forest like Pohara-Malkhed is Nursery. Amravati forest department organize census the interested peoples must join these census by this they can increase there knowledge about wildlife and Nature. The schools and Collages must arrange some educational tours or visits to forest so that next generation must aware about their birth source and the important aspects of wildlife and Nature. These tours must be arrange with the help of peoples who has good knowledge of wildlife and nature in the locality and with the help of forest officers also.
                                           The Pohara-Malkhed Forest is rich source of knowledge about Wildlife and Nature with the specimen of wild animals,everybody must visit this forest.



                                          Adv. Tanmay Deo. 




Sunday, 9 December 2012

Melghat Tiger Reserve

                        
                            मेळघाट व्याघ्र प्रकल्प 


                                आज मी तुम्हाला ज्या जंगलाबद्दल माहिती सांगणार आहे ते जंगल म्हणजे अमरावती जवळ असलेले मेळघाट चे जंगल. अतीशय हिरवेगार आणि घनदाट असे मेळघाट चे जंगल आजू बाजूच्या परिसरात सुद्धा प्रसिद्ध आहे. मेळघाट ला व्याघ प्रकल्प घोषित करण्यात आले आणि मेळघाट चे महत्व खूप वाढले. नक्कीच वाघाच्या रक्षणाच्या दृष्टीने मेळघाट उत्तम आहे आणि त्याचा पुरावा आपल्याला प्रत्यक्ष मेळघाट ला गेल्यावर भेटतो. तसाच मेळघाट मध्ये आदिवासी बांधवांची एक वेगळी संस्कृती अस्तित्वात आहे. आदिवासी बांधव जंगलाचा रक्षणात वनविभागाची नेहमीच मदत करतात. 

                                
                             मेळघाट  जंगलात वाघ, बिबट , अस्वल, अस्वल, चितळ, कोल्हे, लांडगे, रानमांजर, बायसन, विविध पक्षी , विषारी बीनविषारी सर्प तसेच विविध वनस्पती आढळतात. मी खूप वर्षांपासून मेळघाट मध्ये पदभ्रमण करत आहे, माला अनेक वन्य प्राण्यांची सायटिंग सुद्धा  झाली आहे. ज्या लोकांना वन्य प्राणी तसेच निसर्गाचा अभ्यास करायचा असेल त्यांच्या साठी मेळघाट म्हणजे बेस्ट आहे. चिखलदरा इथे राहायची उत्तम व्यवस्था सुद्धा आहे. 



                                  चिखलदरा हा मेळघाटचाच एक भाग असून हा परिसर जसा काही निसर्गाने दत्तक घेतला आहे. वरील फोटो हा चिखलदरा च्या माकडाचा आहे तेथे माकड संखेने जास्त असून अगदी रस्त्याच्या शेजारी सुद्धा तुम्हाला दिसून पडतात. चिखलदरा ला अस्वल सुद्धा जास्त आहेत तसेच ते संध्याकाळी बाहेर सुद्धा पडतात त्यामुळे चिखलदरा ला संध्याकाळ नंतर बाहेर फिरणे म्हणजे धोकादायकच आहे. मेळघाट चे जंगल म्हणजे वेगवेगळ्या घाटांचा मेळ त्याच मुळे त्याला "मेळघाट " असे म्हणतात. मेळघाट मध्ये वाघाला पाहणे म्हणजे खूपच दुर्लभ. जंगलात तसे सुद्धा वाघ दिसणे म्हणजे नशीब बलवत्तर असे म्हणतात कारण कि वाघ ला जंगलाचा राजा आहे आणि वाघ सहसा समोर येत नाही. मेळघाट मध्ये बायसन, हरीण, तडस तसेच वेगवेगळ्या पक्ष्यांची सायटिंग होण्याचे चान्सेस जास्त आहे. टायगर बघण्यासाठी मार्च, एप्रील आणि मे  हे तीन महिने बेस्ट, कारण की उन्हाळ्यात जंगलातील पाणवठे सुकून जातात आणि वन्य प्राणी पाणी पिण्याकरिता बाहेर पडतात आणि टायगर दिसण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. 





                            टायगर बघायचा असल्यास आपल्याला ट्री हाउस  चा खूप फायदा होतो याला माचान  सुद्धा म्हणतात. या माचानी पाणवठ्याजवळ असतात जनावर पाणी प्यायला आले कि त्यांचा छान अभ्यास आपण करू शकतो. टायगर आपल्या  कब्स  सोबत पुष्कळदा उन्हाळ्यात इथे पाणी प्यायला  येतात. वरील फोटो हा नरनाळा  येथील आहे, इथे सुद्धा टायगर दिसण्याचे चान्सेस खूप आहेत, मेळघाट पासून काहीच अंतरावर नरनाळा अभयारण्य  आणि नरनाळा किल्ला आहे, त्याचा मी बनविलेला व्ही डी ओ वर पेस्ट केलेला आहे.



                                 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग म्हणजे 'सेमाडोह', इथली लोकं जणू काही निसर्गाच रक्षण करण्यास नेहमीच तत्पर आणि पर्यटकांना माहिती देण्यास समोर असतात. वरील फोटो हा मी काढला असून तो सेमाडोह ला एका गावकर्याच्या घरात निघालेल्या कोब्रा सापाचा आहे. गावातील लोकांनी त्या सापाला जीवनदान दिले, माझा गाईड मित्र 'भोला' ने त्याला पकडले आणि जंगलात सोडून दिले. हाच साप जर शहरात निघाला असता तर कदाचित त्याचा जीव घेऊन काही डरपोक लोकांनी त्याला काठीवर घेऊन आपण त्याला मारून किती मोठे युध्द जिंकले किव्हा आम्ही किती महान आहे हे दाखवून दिले असते, अश्या मूर्खांना आपण सर्वात मोठे गाढे आहोत हेय माहित नसते. सगळेच सर्प हे काही विषारी नसतात फक्त नाग, घोणस , मण्यार आणि फुरसे हे चार विषारी साप प्रामुख्याने  सापडतात बाकी सर्प हे  विषारी अथवा बीन विषारी असतात पण महामुर्खांसमोर डोकं फोडून काही उपयोग नसतो त्यांच्या मते सगळेच सर्प विषारी असून त्यांना मारायलाच पाहिजे ही त्यांचे कुबुद्धी. मित्रांनो साप दिसल्यावर सर्पमित्रांना आपण दूरध्वनी करावा जेणे करू ते तत्काळ तिथे पोहचून त्या सापाला वाचवतील.




                            मेळघाट मध्ये असे छोटे छोटे पाणवठे खूप आहेत आणि इथे टायगर सुद्धा दिसून येतात. वरील फोटो हा मेळघाटच्या एका पाणवठा चा आहे इथे माझ्या मित्राने टायगर बघितला होता तो सुद्धा कब्स सोबत. मेळघाट पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूपच सुंदर दिसते, उन्हाळ्यात सुद्धा मेळघाट खुलते पण तो मौसमच जणू फक्त सायटिंग चा असतो. सगळे जंगल रखरखत्या उन्हामुळे सुकून गेले असते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे वन्य प्राणी आपली भटकंती सुरु करतात, अश्या वेळी टायगर आणि इतर वन्य प्राण्यांची सायटिंग होवू शकते.


                                                                                     - तन्मय देव